Tuesday, April 19, 2011
वसंत ऋतू -
वसंत ऋतू (Spring) किती आल्हाददायक असतो नाही! हवेतला गारवा, अधून मधून पडणारया पाऊसधारा. एरवी winter मध्ये पाने गळून नागवे झालेले वृक्ष जागे होतात आणि अंगावर फुलांचा नाजूक असा शृंगार धारण करतात. फुलेही किती वेगवेगळ्या रंगांची, आकाराची,अन वासाची. इथे उत्तर अमेरिकेत तर जे हिवाळ्यात जमिनीखाली दबलेले tulips आपल्या माना हळूहळू वर करतात. त्यांचा रंग म्हणजे तर त्यांची शान- काही लालभडक, काही पिवळी, काही गुलाबी तर काही सफेद पण सर्व अगदी भडक. रंगांचा मयदार प्याला जणू! गवतही असे कोवळे , लुसलुशीत आणि इतके भरभर वाढणारे.
मी ज्या राज्यात राहतो तिथे- Kentucky मध्ये एक फार सुंदर अशी बाग आहे. Kentucky arboretum अशा नावाची. तिथे मी काढलेले काही snaps इथे आहेत. इथे म्हणे गवताला एक पुसटशी निळी छटा असते आणि म्हणून अशा गवताला bluegrass असे म्हणतात. हा प्रदेशही म्हणूनच bluegrass region म्हणून प्रसिद्ध आहे.असं म्हणतात कि इथलं गवत इथे जमिनीखाली असलेल्या limestone मुळे फार पौष्टिक असते आणि म्हणूनच हे गवत खाऊन इथले घोडे फार तगडे होतात.
मुंबईत असताना वसंत ऋतू म्हणजे काय ते माहित असणं हे फक्त पुस्तकी ज्ञानामुळे.उत्तर भारतात तो बहुधा जास्त प्रमाणात अनुभवायला मिळत असेल. भारतात या वेळेस वसंत पंचमी साजरी होते. प्रेम साजरे करण्यासाठी एक खास दिवस, पाश्चात्य संस्कृतीचा St Valentine day हि याच सुमारास येतो. आता वसंत पंचमी साजरी करायची कि St Valentine दय हे तुमचं तुम्ही ठरवा. Irish लोकांसाठी हा ऋतू विशेष कारण त्यांचा St Patricks day हि याच ऋतू मध्ये येतो.
असा हा माझा आवडता ऋतू. आता लिहिणं थांबवतो आणि pics upload करतो.
आवडल्यास प्रतिसाद जरूर द्या!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment